माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना च्या काळात कष्टकरी कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट ओढविले आहे. बऱ्याच जणांचे कुटुंब आर्थिक संकटामुळे डबघाईला आले आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेले उद्योग यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन आपल्या कुटुंबासाठी मोठा हातभार लावणाऱ्या महिला वर्गांला सक्षम करण्याकरता माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘बेसिक टेलरिंग व ऍडव्हान्स टेलरिंग कोर्सेस’ उपलब्ध करून दिला आहे.
याबद्दलची माहिती मॅकन्यूज ला देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, कोरोनाकाळात अनेक उद्योग डबघाईस आले. बऱ्याच जणांना आपले उद्योगधंदे इच्छा नसतांना बंद करावे लागले. यात अनेक होतकरू माता-भगिनींचा देखील समावेश होता. अशा माता-भगिनींना परत त्यांच्या पायावर उभे राहता यावे याकरिता संजयगांधी वसाहत, लमाणतांडा, निम्हणमळा, सोमेश्वरवाडी, पाषाण भागातील महिलांसाठी सोमेश्वर फाऊंडेशन व यार्दी वस्ती विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘बेसिक टेलरिंग व ऍडव्हान्स टेलरिंग कोर्सेस’ उपलब्ध करून देत आहोत.
अधिक माहितीसाठी 8308123555 / 7030278349 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी महिला वर्गांना केले. सदर व्यवसाय प्रशिक्षण कस्तुरबा खादी महिला ग्राम विद्यालय अंतर्गत टेलरिंग प्रशिक्षक उज्वला जाधव आणि सिनियर टीम लीडर विजय पगारे व टीम लीडर संतोष शिर्सिकर यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण साठी १५ महिलांची एक बॅच केली जाणार आहे. दोन बॅच फुल झाल्या असून. अजून बॅचेस साठी नोंदणी सूरू आहे. या प्रशिक्षणाची फी २५०० रूपये असून या उपक्रमात केवळ ५०० रुपये फी आकरली जाईल. ज्या महिला प्रशिक्षणार्थी महिला हा प्रशिक्षण कोर्स पुर्ण करतील त्यांना सोमेश्वर फाउंडेशन च्या माध्यमातून हा कोर्स फ्री मध्ये करून दिला जाईल.