निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ मा.सिद्धार्थजी शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी कै.खंडेराय जुनवणे शाळा, कस्तुरबा वसाहत औंध येथे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आज दुसर्या दिवशी शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला. शिबीरास औंध तलाठी ढेरे भाऊसाहेब व संजय गांधी निराधार योजनेच्या शांता बानखेले मॅडम ह्यांनी पुर्ण कागदपत्रे असणार्यांची प्रकरणे जागेवर मंजुर केली.
आपला नम्र,
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक




