मोफत ई श्रम योजना नोंदणी

लोकोपयोगी कार्यासाठी सतत कष्ट घेणारे लोकनेते समाजाची प्रगती घडवू शकतात ह्या उक्तीचा आदर्श ठेवत, सनी विनायक जी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मोफत ई श्रम योजना नोंदणी’, मोफत युनिवर्सल पास (लसीकरण प्रमाणपत्र), मोफत आधार नोंदणी, आणि ‘मेरी बेटी मेरा अभिमान’ ‘सुकन्या समृद्धी योजना’ या सर्व योजनांच्या नोंदणीचा उपक्रम इंदिरा गांधी वसाहत येथे आणि कस्तुरबा वसाहत येथे यश्वस्वीपणे राबवण्यात येत आहे. नागरिकांनी उपक्रमाच्या पहिल्याच काही वेळामध्ये प्रचंड भरघोस प्रतिसाद दिला, आणि त्याचमुळे सर्व कार्यकर्ते आणि संबंधित मदतनीस या सर्वांना वेगळाच हुरूप आला. आणि आम्हाला खात्री आहे कि नागरिकांचा असाच प्रतिसाद आम्हाला पुढचे सगळे दिवस लाभणार आहे. ह्या योजनेचा सर्व नागरिकांना आजपासून ते २० फेब्रुवारीपर्यंत, स. १० ते संध्या. ५ या वेळात लाभ घेता येणार आहे.

Scroll to Top