बालमेळावा

नववर्षारंभानिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनतर्फे भव्य ‘बालमेळावा’ दि. २ जानेवारी २०२२ आयोजित केला होता. या बालमेळाव्यात परिसरातील बालगोपाळांसाठी विविध आकर्षक खेळ, मनोरंजन साधने, आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू इत्यादी उपलब्ध करून दिले गेले. या बालमेळाव्यामुळे वातावरण अतिशय प्रसन्न झाले होते आणि परिसरातील लहान मुलांचा व त्यांच्या पालकांचा नवीन वर्षाचा प्रारंभ अगदी उत्साहात झाला. सहभागी झालेल्या सर्व बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बालमेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय सत्कारणी लागल्याची भावना मनात निर्माण झाली.”जल्लोष बाल गोपाळांचा…शुभारंभ करेल नववर्षाचा!” #happynewyear2022

Scroll to Top