सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली! या भव्य संगीत स्पर्धेचे आयोजक सनी विनायक निम्हण होते. आपल्यातल्या संगीतप्रेमींनी आणि गुणवान गायकांनी यात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव दिला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन! आपल्या सर्जनशीलतेमुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली.
सोमेश्वर फाउंडेशन आयोजित “पुणे आयडॉल” ह्या स्पर्धेची भव्य अशी तयारी सुरु झाली आहे. सन 2002 मध्ये स्व. आबांच्या संकल्पनेतून ‘पुणे आयडॉल’ या स्पर्धेला सुरुवात झाली. यंदा स्पर्धेचे हे बाविसावे वर्ष आहे. “पुणे आयडॉलच्या निमित्ताने हौशी कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत असतो. आज किती तरी कलाकार “पुणे आयडॉल” मुळे गायन क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहे.
यंदाची स्पर्धा येत्या २७ मे ते २९ मे रोजी पुणे आयडॉल स्पर्धेची प्राथमिक व उपांत्य फेरी पार पडणार असून याबरोबरच स्पर्धेची अंतिम फेरी २ जून २०२४ रोजी बालगंधर्व येथे पार पडणार आहे.
यंदाच्या या स्पर्धेचे उदघाटन २७ मे रोजी सकाळी 10 वाजता पं. भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे होणार आहे. यानिमित्ताने पुणे शहरातील गायक कलाकारांनी मोठ्या संख्येनी स्पर्धेत सहभागी व्हावे असं आवाहन मी या निमित्ताने करतो. त्यासाठी या स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज www.sunnynimhan.com येथे भरू शकता तर ऑफलाईन साठी “सोमेश्वर फाऊंडेशन, ४४६, गोपी भवन, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर गावठाण, पुणे येथे फॉर्म घेऊन भरू शकता.
तसेच प्रेक्षकांचा प्रतिसाद हा या उमलत्या ताऱ्यांसाठी अनमोल आहे. त्यामुळे समस्त पुणेकर नागरिकांनाही विनंती आहे कि आपण अवश्य या स्पर्धेला उपस्थित राहून गायनाचा आनंद घ्यावा.
चला, आपण सगळे मिळून आपल्या उदयोन्मुख कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ देऊया… आबांनी सुरु केलेली हि परंपरा त्याच ध्यासातून पुढे नेऊया!
अधिक माहिती साठी 8308123555 वर संपर्क करा.
आपल्याला पुढील कार्यक्रमांची माहिती आणि अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत संपर्कात रहा.
धन्यवाद!