“सोमेश्वर फाउंडेशनतर्फे योगदिन उत्साहात”

येथील गोविंद मंगल कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विशेष योग शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या शिबिराचे उद्घाटन उपस्थित ज्येष्ठ नागरिक व योग प्रशिक्षक मनीषा सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. निरोगीपणाला प्रोत्साहित करणारी आपली प्राचीन उपचार पद्धती जगाने
स्वीकारली आहे. आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी संबंधित विकारांवर रामबाण उपाय म्हणजे योग होय.
म्हणूनच सर्वांनी योगाचे महत्त्व जाणून आपल्या जीवनात योगासने केली पाहिजेत असे माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिकांसोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील योग दिनानिमित्त योगासन करत योगाचे महत्व जाणून घेतले.

Close
Close