*शाश्वत आनंदवृद्धीसाठी!*
*सुकन्येच्या समृद्धीसाठी*
*शाश्वत आनंदवृद्धीसाठी!*
आज जगभरात मातृदिन उत्साहात साजरा केला जातो आहे. आईची महती, तिचा त्याग शब्दात मांडणे केवळ अशक्य. आमच्या मातोश्रीने आमच्यावर केलेल्या संस्काराची शिदोरी आम्हाला समाजासाठी काही तरी करण्यासाठी सातत्याने उद्युक्त करत असते. हीच गोष्ट लक्षात घेऊन व मातृदिनाचे औचित्य साधून, देशाचे भविष्य असलेल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या मुलींची आज आम्ही आवश्यक रक्कम भरून खाते उघडत पासबुक त्यांना देण्यात आले. याप्रसंगी आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या मातांनी घेतलेला पुढाकार देखील खरोखरीच कौतुकास्पद आहे. या सुकन्यांच्या भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण लावत असलेला हातभाराचा शुभारंभ जागतिक मातृदिनाला व्हावा यापेक्षा दुग्धशर्करा योग कुठला असावा.
इंदिरा वसाहत बालवाडी येथील या सुकन्या समृद्धी योजना कार्ड वाटप कार्यक्रम व मातृदिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी शिक्षण मंडळ सदस्य मा. अमित भाऊ मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ कांबळे, मा. अन्नधान्य सदस्य सौ. वनमाला प्रमोद कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ तराडे, गणेश धस, आनंद साठे, सोपान मोरे, अमित खरात, संजय थोरात, सारिका वाघमारे, प्रणव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला नम्र,
*सनी विनायक निम्हण*
मा. नगरसेवक