सामान्यपणे आरोग्य शिबीर म्हटलं की फक्त तपासणी आणि औषधोपचार असेच स्वरुप बघायला मिळते. परंतु गरजूंना सर्व प्रकारच्या आधुनिक चाचण्या, तपासण्या आणि अगदी शस्त्रक्रिया पण मोफत मिळाल्या तर खऱ्या अर्थाने मदत होईल असा विचार आम्हा आबाप्रेमींच्या मनात आला. बघताबघता सगळी यंत्रणा सज्ज झाली आणि पुण्यातील एका अभूतपूर्व उपक्रमाची संकल्पना नक्की झाली.
आबांच्या जयंती निमित्त येत्या 6 ऑगस्ट रोजी पुण्यात एक अभूतपूर्व असे महा आरोग्य शिबीर आयोजित करत आहोत. लोकसेवा हाच आबांच्या जीवन प्रवासाचा एकमेव ध्यास होता. गरजूंना मदत करण्यावर त्यांचा विशेष भर असायचा आणि त्यातूनच अनेक उपक्रम त्यांनी राबविले होते. त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे दरवर्षी नित्यनेमाने आयोजित करण्यात येणारे आरोग्य शिबीर. हाच उपक्रम त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्यापक स्वरुपात आयोजित केला तर तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
चला आपण सर्व मिळून हा उपक्रम यशस्वी करूया!