आपल्या पुणे महानगरातील नागरिकांना वाहतूक सेवा पुरविणारी पीएमपीएल बस पुणेकरांची जीवनवाहिनी आहे. नुकतेच पुणे महानगर परिवहन महामंडळाने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणेसाठी डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक सामान्य पुणेकर म्हणून माझा या निर्णयाला विरोध आहे. कारण आपल्या पुणे शहरातील अनेक मार्गांवर बस भुयारी मार्गाने जाते या मार्गांवर डबल डेकर बस चालवता येणार नाही त्या ऐवजी मिनी बस खरेदी केल्या तर पुण्यातील पेठामधील रस्त्याने देखील पीएमपीएल बस सेवा देणे शक्य होईल. नागरिकांना पीएमपीएलच्या विश्वासात आणखी भर पडेल.
पीएमपीएल ने डबल डेकर बस खरेदीचा निर्णय रद्द करावा यासाठी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पाककमंत्री अजितदादा पवार व पीएमपीएल अधिकाऱ्यांना मेल केला आहे.
पुणेकरांचे व पुणे शहराचे हित लक्षात घेऊन डबल डेकर बस खरेदीचा निर्णय रद्द करून मिनीबस खरेदीचा निर्णय घ्यावा, ही विनंती!
@mieknathshinde@devendra_fadnavis
@ajitpawarspeaks@pmpml_pune
#PMPML#pcmc#BRT#doubledecker#BUS#minibus#pune#punecity