जिव्हाळ्याच्या नात्याच्या काही गाठी ह्या आजन्म टिकतात आणि काळाच्या ओघात अधिकाधिक घट्ट होत जातात. मा. राजसाहेब आणि निम्हण कुटुंबाचे नाते हे असेच मानले जाते. आबा शिवसेनेत असताना मा. राजसाहेबांसोबत त्यांचे जे घनिष्ठ संबंध निर्माण झाले त्याचा धागा आज आबा गेल्यावरही राजसाहेब त्याच आपुलकीने आणि मायेने जपताहेत हे बघून मोठा आधार वाटला. १९९९ साली पहिल्यांदाच मा. राजसाहेब हे सोमेश्वरवाडी येथे आले होते. एकाच दिवसात तीन मोठ्या उपक्रमांचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते झाले होते. राजमाता जिजाऊ घाट नामकरण व लोकार्पण सोहळा, पुणे महानगरपालिकेच्या वसंतदादा पाटील मुलींच्या शाळेच्या पहिल्या मजल्याचे उदघाटन, संजय महादेव निम्हण उद्यानाचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यानंतर सुमारे २२ वर्षांनी ते आज पुन्हा सोमेश्वरवाडी येथे आले आणि सुवर्णमय स्मृतींना उजाळा मिळाला. याप्रसंगी आबा विभागप्रमुख असताना त्यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. त्यावेळी शिवउद्योगसेनेतर्फे पुण्यात ज्या खास सवंगड्यांच्या साथीने नटरंग सांस्कृतिक महोत्सव आणि जिगर २००० या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात आबांचा समावेश आणि योगदान यांची त्यांना आठवण झाली.
दिलदार, राजा मनाचा माणूस अशी राजसाहेबांनी ओळख आहे. त्याचा प्रत्यय या भेटीतून आला. आजही राजसाहेबांनी आबांच्या मैत्रीचा धागा आणि कौटुंबिक संबंध ज्या तळमळीने जपले हे बघून कृतार्थ झालो. त्यांनी कुटुंबातील सगळ्यांची विचारपूस केली, संवाद साधला आणि माझ्या व्यावसायिक व सामाजिक कार्यातील वाटचालीचेही विशेष कौतुक केले.
हे ‘राज’नाते असेच घट्ट होत जावो हीच मनोकामना!
#sunnynimhan#vinayakaabanimhan#RajThackeray#GreatBhet#inspirationalmeet#family