जागतिक योग दिनानिमित्त आज इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी *’विशेष योग शिबिर’* आयोजित केले होते. ते शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या शिबिरात *योगप्रशिक्षक शिवाली महेंद्र बामगुडे* यांनी योगाभ्यासाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा भर नेहमीच योगमय सुदृढ निरोगी राष्ट्रनिर्माण करण्यावर आहे. यामुळे मुलांवर लहान वयातच योगसंस्कार घडावे यादृष्टीने हे योग शिबिर आयोजित केले होते.
मुलांचा उत्साह व उत्स्फूर्त सहभाग बघून योगाबद्दल त्यांच्या मनात जागृती घडविण्यात हे शिबिर यशस्वी झाले, हे मी याठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो.
आपला नम्र,
*सनी विनायक निम्हण*
(मा. नगरसेवक, पुणे मनपा)





