Someshwar Foundation Pune | ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक, कलाकरांची ‘पुणे आयडॉल २०२५’ स्पर्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील १९ ते २४ मे २०२५ या दरम्यान, पंडित भिमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार असल्याची माहिती सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांनी दिली.
दिवंगत आमदार विनायक निम्हण यांनी सन २००३ साली सुरू केलेल्या या स्पर्धेचे यंदा २३ वे वर्ष आहे. स्पर्धेचे उदघाटन गायन क्षेत्रात राष्ट्रपती पदक विजेत्या, प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र यांच्या हस्ते सोमवार दि.१९ मे, सकाळी ९.३० वा. पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे होणार आहे. अंतीम फेरी २४ मे २०२५ रोजी, १२ ते ३ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. स्पर्धेचे फॉर्म www.sunnynimhan.com या संकेस्थळावर उपलब्ध असणार आहेत. प्रवेशाची अंतीम तारीख १५ मे २०२५ राहिल. अधिक माहितीसाठी संपर्क : सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, पुणे.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून रामेश्वरी वैशंपायन, कल्याणी देशपांडे, जितेंद्र भुरूक, कोमल लाळगे हे काम पहाणार आहेत. वय वर्षे १५ पर्यंत ‘लिटिल चॅम्प्स’, वय ‘१५ ते ३० वर्ष ‘युवा आयडॉल ‘,३० ते ५० वर्ष ‘जनरल आयडॉल ‘वर्ष ५० नंतर ‘ओल्ड इज गोल्ड’ अशा चार गटात स्पर्धा होणार आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पाच हौशी कलाकारांना विशेष निमंत्रित करून त्यांना गाण्याची संधी देऊन त्यांना सोमेश्वर फाउंडेशन तर्फे सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम १५ हजार, १० हजार व मानाचे ‘पुणे आयडॉल’ सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने काही निवडक व प्रतिभावंत कलाकारांना शैक्षणिक व वैद्यकीय गरजेपोटी मदत म्हणून रोख रक्कम दिली जाते.