धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले

पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात नुकतीच अभिजित गुंड या तरुणाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडून त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची व आणि शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याची मागणी काल महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती.

आपल्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी तत्काळ या प्रकरणी अहवाल मागवत दोषींवर कारवाई करण्याचे व शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले. यापुढील काळात अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी !

#sunnynimhan#vinayakaabanimhan#UrbanGovernance#pune#punecity#punemuncipalcorporation#Mismanagement#trees#building#Development#Urban#Calamity#disastermanagement

Scroll to Top