आबा.…

आबा.…
आजही घरी आल्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे वाट पाहत आहात, असेच वाटते. तुम्ही आम्हाला दिलेल्या संस्कार, जनतेचे प्रश्न सोडवताना तुमची सातत्याने येणारी आठवण, हे शब्दात सांगता येणार नाही. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल, जनतेचे प्रश्न सोडवताना अडचणी येत असतील, तर फक्त डोळे बंद करून, आबांनी यावेळी काय केले असते, असा विचार केला तरी तो प्रश्न अगदी सहज सूटला जातो…
आबा, तुम्ही सोबत आहात, माझ्या अवतीभवती आहात! आबा तुम्ही आजही जनतेच्या मनात जिवंत आहात, हिच खरी आपली श्रीमंती आहे. तुम्ही निस्वार्थपणे केलेल्या जनसेवेच्या माध्यमातून जी लोकं जोडली ती माझ्यासह संपुर्ण निम्हण कुटुंबावर जीवापाड प्रेम करतात! त्या प्रेमात व विश्वासात तुम्ही अजरामर आहात!
माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी राहतात! आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की मला कोणी नवीन माणूस भेटून तुम्ही त्याच्यासाठी काय केलं, हे सांगून गेला नाही. तुम्ही जी असंख्य लोकं जोडली त्या सर्वांच्या आठवणीत व माझ्या मनात तुम्ही कायमच घर करून आहात.
शेवटी तुम्ही नेहमी म्हणायचे ना “माणूस त्याच्या कर्माने ओळखला जातो” त्यामुळेच तर तुमच्या स्मृती या भविष्यातील पिढ्यानंपिढ्या मिटणार नाही, याची खात्री आहे. आम्ही तुमचा जनसेवाचा वारसा वसा म्हणून सक्षमपणे पुढे घेऊन जात राहू!

नेहमी तुमचाच…!!
सनी

#VinayakAabaNimhan#aaba#SunnyNimhan#Aundh#Someshwarwadi#ShivajiNagar

Scroll to Top