दि.15 फेब्रुवारी 1950 साली पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली. मधल्या काळात पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुण्यात असंख्य बदल घडवून आणले गेले. खरं तर पुणे मनपाचा प्रवास पेठांपासून सुरू झाला आणि आज ती लोहगावपासून ते खडकवासला आणि मांजरीपासून सूस गावपर्यंत एवढ्या क्षेत्रफळात विस्तारली आहे. त्यामुळे आपली पुणे मनपा महाराष्ट्रातील सर्वांत मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.
सन 2012 ते 2017 असे 5 वर्ष मला पुणे मनपाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या संपूर्ण कार्यकाळात मी माझ्या भागात शक्य तेवढा विकास आणण्याचा प्रयत्न केला. Aims Hospital आणि सयाजीराव गायकवाड उद्योग भवन कार्यान्वित, पुणे मनपाच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि कॉम्प्युटर लॅब्स, मुळा नदी परिसर विकास, पाषाण बाणेर ते सोमेश्वरवाडी ब्रीज, सोमेश्वरवाडी मंदिराचा जीर्णोद्धार, सनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यान, अग्निशामक केंद्र, इतर पायाभूत सुविधा व महिला सक्षमीकरण यांसारखी अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाली. पुणे मनपाचा प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य पार पाडताना मला मनपा मधील पदाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ट सहकारी तसेच जनतेची देखील मोलाची साथ लाभली.
आज पुणे महानगरपालिकेचा ७३वा वर्धापनदिन साजरा करतांना पुणेकर असल्याचा आनंद आणि गर्व आहे. त्यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना, माझ्या बंधू-भगिनींना पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!