स्व. आबांचा आज पहिला स्मृतिदिन ! ३६८ विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान !

स्व. आबांचा आज पहिला स्मृतिदिन ! ३६८ विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान !

पुणे शहरात शिक्षण घेत असलेल्या ३६८ विद्यार्थ्यांना स्व. विनायक (आबा) निम्हण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे हा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अतुल बेनके, आमदार सत्यजीत तांबे, माजी मंत्री सुरेश नवले सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर हे उपस्थित होते.

‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’मुळे गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागला याचा मनापासून आनंद होतोय. स्व. आबांनी कायमच लोकहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान होत असताना माझ्या मनाला स्व. आबांचा जनसेवेचे वसा पुढे घेऊन जात असल्याचे खूप मोठे समाधान मिळाले.

#SunnyNimhan#VinayakAabaNimhan#Pune#Students#Scholarship#Education#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar

Scroll to Top