आपल्या सोसायटी गार्डन संगोपन अभियानात, जागतिक पर्यावरण दिनाच्या उपलक्ष्यात, औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी व सुतरवाडी या परिसरातील हाऊसिंग सोसायटीमधील गार्डनसाठी एक विशेष हरित उपक्रम आयोजित केला गेला आहे. या उपक्रमाच्या भागीदारीत, मोफत झाडांचे चोंपिंग, ट्रिमिंग, व कटिंग कीड नियंत्रणासाठी जैविक फवारणी व केवळ सेंद्रिय खतांचा डोस वितरण केला गेला आहे.
या प्रयासातून, आपल्या सोसायटीमधील गार्डनसाठी एक स्वच्छ, हरित आणि सुंदर वातावरण सुरक्षित ठेवण्याचा हा सामाजिक उपक्रम विशेष निदर्शन देतो.
आपल्याला मिळालेली सर्वोत्तम भेट म्हणजे ही सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त व हरित सृष्टी. ही निसर्गदत्त भेट, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करून, पर्यावरणाचा समतोल अबाधित राखून भावी पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे.
आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण सप्ताह म्हणून आपण २ जून ते ९ जून २०२४ दरम्यान *’सोसायटी गार्डन संगोपन अभियान’* राबवित आहोत. या विशेष हरित उपक्रमा अंतर्गत झाडांचे चॉपिंग, ट्रीमिंग व कटिंग, कीड नियंत्रणासाठी जैविक फवारणी, झाडांना सेंद्रिय खतांचा डोस इ. पर्यावरण संवर्धनाची कामे पाषाण, औध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी येथील विविध सोसायटीमध्ये मोफत करत आहोत.
आपल्याला ही कामे आपल्या सोसायटीमध्ये करून घ्यायची असल्यास कृपया 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा.नगरसेवक