सशक्त व सक्षम महिला ही उज्ज्वल भविष्याची व प्रगत समाजाची प्रमुख दुवा असते. येत्या २० फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे. समाज सेवेचा घरातूनच लाभलेला समृद्ध वारसा पुढे जपत हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लावण्याचा माझा दरवर्षी प्रयत्न असतो. म्हणूनच आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त आपला प्रभाग क्र.१२(औंध-सोमेश्वरवाडी-बालेवाडी) च्या नागरिकांसाठी ‘मेरी बेटी, मेरा अभियान!’ सुकन्या समृद्धी योजनेचे मोफत खाते व मोफत ‘आधारकार्ड नोंदणी’ अभियान राबवित आहोत. या अंतर्गत मुलींच्या समृद्ध भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आम्ही मोफत काढून देणार आहोत. तसेच नवीन आधारकार्ड व अपडेट देखील या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या प्रभागातील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी या अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा, ही नम्र विनंती!
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक