मा.कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण साहेब
यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर मतदार संघातील सात ठिकाणी जनतेसाठी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
काल दिनांक ०१/०५/२०२२ रोजी शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक मा. सनी निम्हण, भारतीय जनता पार्टीचे शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष रविंद्र साळेगावकर, समाधान शिंदे, संजय खडसे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिक्षण मंडळाचे मा. सदस्य अमित मुरकुटे, हरिष निकम, अनिकेत कपोते, प्रकाश सोलंकी, शैलेश बडदे, उपस्थित होते.. या शिबिराचा ३३५ लोकांनी लाभ घेतला व १५१ लोकांना मोफत चष्मे वाटण्यात आले. दिनेश पांडे , प्रांजय स्वामी, सुमित गायकवाड, आप्पा ढाबडे, धनंजय कांबळे, कुलदीप चांडेल, चेतन गौतम, मयूर परदेशी, नरेंदर गायकवाड, अमृष दास, अनिकेत मोरे. उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन लितेश ऊर्फ टिंकु दास व अभिषेक परदेशी यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यास Global Hospital यांच्या तज्ञ डॉक्टर व स्टाफ़ यांचे सहकार्य लाभले.




