विनायक निम्हण स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा स्पर्धा

सोमेश्वर फाऊंडेशन व क्रीडा जागृती आयोजित माजी आमदार कै विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत राज्यभरातून अव्वल मानंकीत २१२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड, सनी रिसॉर्ट, पाषाण सुस रोड या ठिकाणी २ ऑगस्ट २०२४ पासून रंगणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसलडा आणि मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितले कि, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निम्हण यांच्या पुढाकाराने हि स्पर्धा पुण्यात होत आहे. गतवर्षी देखील या

ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लाभला होता. यावर्षी देखील या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात १८० खेळाडूंनी तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी भाग घेतला आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब

चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात ५८ गुण मिळविणाऱ्या मुंबईच्या महम्मद घुफ्रान याला तर महिला एकेरी गटात ७५ गुण मिळवून आघाडीवर असणाऱ्या मुंबईच्या काजल कुमारीला

प्रथम मानांकन देण्यात आले आहे. २ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होणार असल्याचे मानद सचिव अरुण केदार यांनी नमूद केले. सोमेश्वर फाऊंडेशनचे उमेश वाघ यांनी सांगितले की, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेबरोबरच जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ९ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड, सनी रिसॉर्ट, पाषाण सुस रोड या ठिकाणी पार पडणार असून यामध्ये जिल्ह्यातून ४०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.

पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आणि मानद सचिव रणजित नातू यांच्या सहकार्याने व मान्यतेने ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी सनीज वर्ल्ड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

कॅरम स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी

पुरुष एकेरी : १) महम्मद घुफान (मुंबई), २) विकास धारिया (मुंबई), ३) प्रशांत मोरे (मुंबई). ४) अभिजित त्रिपनकर (पुणे), ५) पंकज पवार (मुंबई), ६) रहिम खान (पुणे), ७) संदीप दिवे (मुंबई उपनगर), ८) झैद फारुकी (ठाणे)

महिला एकेरी : १) काजल कुमारी (मुंबई), २) समृद्धी घाडीगावकर (ठाणे), ३) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ४) ) आकांक्षा कदम (रत्नागिरी), ५). ५) अंबिका अंबिका हरिथ हरिथ (मुंबई). ६) श्रुती सोनावणे (पालघर), ७) उर्मिला शेंडगे (मुंबई) ८) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग)

खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे चेअरमन व सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले की, सलग दुसऱ्या वर्षी माजी आमदार कै विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनी स्पोर्ट्स किंग्डम, सनीज वर्ल्ड या ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यांतील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या हेतूने यास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sports Competitions Organized In Memory Of Late MLA Vinayak Nimhan 

Scroll to Top