सहकार विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंटसाठी *मानीव हस्तांतरण(Deemed Conveyance), गृहनिर्माण संस्था निवडणूक थकबाकीदार, पुनर्विकसन/स्वयंपूनर्विकसन या सर्व विषयांवर आम्ही मार्गदर्शन कार्यक्रमाचे* १४ मे २०२२ रोजी आयोजन केले होते. या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थित होते व त्यांनी उपस्थित नागरिकांना अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले. उपस्थित नागरिकांना या माहितीपूर्ण कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
नागरिकांचा हा उस्फुर्त प्रतिसाद बघून आम्ही प्रत्येक महिन्यांच्या दुसऱ्या रविवारी कुमार प्रेरणा हॉल येथे स. 11 ते दु. २ च्या दरम्यान दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दरबाराला देखील आपण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्याल, याची आम्हाला खात्री आहे.
आपला नम्र,
*सनी विनायक निम्हण*
मा. नगरसेवक, पुणे मनपा


