“भक्तिरंग भजन स्पर्धा उत्साहात”

पुढारी वृत्तसेवा माजी आमदार व प्रसिद्ध उद्योजक विनायक निम्हण यांच्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७व्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून पुणे शहरात विठू माउलींच्या भक्तांसाठी ‘भक्तिरंग’ ही भजन स्पर्धा आयोजित केली होती.
सांप्रदायिक क्षेत्रातील भजन, कीर्तनासाठी ऑनलाइन व्यासपीठ सनी निम्हण यांनी उपलब्ध करून दिले होते. त्याची ऑफलाइन पद्धतीने अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ ४ ऑगस्ट रोजी समस्त निम्हण विठ्ठल मंदिर, पाषाण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेला पुणे शहारातील जवळपास ५० महिला संघ आणि ८ पुरुष संघ अशा ५८ संघांनी सहभाग घेतला होता. बऱ्याच दिवसांनी टाळ, मृदंग, अभंगाच्या निनादात समस्त निम्हण विठ्ठल मंदिर पाषाण परिसर
भजन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करताना मान्यवर. दणादणून गेला.
या वेळी आयोजक माजी नगरसेवक सनी निम्हण, नितीन निम्हण,
संजय निम्हण, बाळासाहेब बामगुडे, वारकरी क्षेत्रातील मान्यवर हभप शांताराम निम्हण, हभप पांडुरंग दातार, हभप मारुती कोकाटे, हभप कृष्णा भोते उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हभप हरिदास गुजर, हभप उद्धव गोरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन नितीन निम्हण यांनी केले. संजय निम्हण यांनी आभार मानले.
:
जोगेश्वरी महिला भजनी मंडळ सुतारवाडी, स्वरांजली महिला भजनी मंडळ ताथवडे, कृष्णाई महिला भजनी मंडळ बावधन खुर्द, पुरुष विभाग विजेते : ज्ञानाई भजनी मंडळ नांदेड सिटी, जय गणेश भजनी मंडळ हडपसर, औंध गाव भजनी मंडळ हे ठरले. उत्कृष्ट हार्मोनियमवादक जयमाला भजनी मंडळ सांगवी, उत्कृष्ट पखवाजवादक स्वरांजली महिला भजनी मंडळ ताथवडे, उत्कृष्ट तबलावादक कृष्णाई भजनी मंडळ चिंचवड यांना पारितोषिके
महिला विभाग अनुक्रमे विजेते देण्यात आली.

Scroll to Top