प्रभाग क्र १२ औंध, सोमेश्वरवाडी बालेवाडी मधील दहावी आणि बारावी परीक्षेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सोबतच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले.
सुप्रसिद्ध करीअर सल्लागार श्री विवेकजी वेलणकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना 10 वी आणि 12 नंतर विविध क्षेत्रात करीयर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोर्सेसची सखोल माहिती दिली. कोर्स किंवा करीयर निवडताना काय निकष लावावे यासंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले.
*या सत्रानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.* गुणवंतांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रेरणादायी होता.
सहभागी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! पुढील दैदीप्यमान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
*आपण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्काराचे फोटोज खाली दिलेल्या अल्बम मध्ये आहेत. तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व पालकांना विनंती आहे कि, आपण आपले फोटोज् त्यातून घ्यावेत व आपल्या मित्र परिवाराला टॅग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत हे फोटोस पोहचवावे.*
या प्रसंगी मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. स्विक्रुत नगरसेवक वसंतराव जुनवणे, औंध विश्वस्त मंडळांचे योगेशजी जुनवणे, सुप्रीम चौंधे, सचीनजी वाडेकर, प्रमोदजी कांबळे, गणेशजी शेलार, सचीन मानवतकर, वनमालाताई कांबळे, कुंभारताई, लताबाई धायगुडे आदि उपस्थित होते.
आपला नम्र *सनी विनायक निम्हण* मा.नगरसेवक