आबांना आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले. आजही असा एकही क्षण नाही की जेव्हा त्यांची आठवण नसेल. आजही आबा त्यांच्या विचारांच्या, आदर्शांच्या आणि संस्कारांच्या रूपाने प्रत्येक क्षणी प्रेरित करत असतात, मार्ग दाखवत असतात. आबांनी आयुष्यभर माणसांची संपदा कमवली. ते गेल्यावर क्षणोक्षणी हे जाणवते. गेले वर्षभर विविध लोकांच्या रूपात आबा आम्हाला भेटत आहेत आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत. त्यांनी जोडलेल्या, त्यांच्या जीवाभावाच्या हजारो लोकांचा हा ठेवा आमच्यासाठी आयुष्याची खरी संपत्ती आहे. आम्ही निम्हण कुटुंबीय ती जिव्हाळ्याने जपू!
आबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दिवाळी पाडवा १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. ते १२ वा. कीर्तन सेवेचे आयोजन केले आहे. किर्तनसेवेनंतर महाप्रसाद होईल.आपण सर्वांनी अवश्य यावे ही आग्रहाची विनंती.
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक.
ठिकाणः-
झुंज बंगला,
सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे
#SunnyNimhan#VinayakAabaNimhan
#deadanniversary#Pune#Aundh#Someshwarwadi#Pashan#Sus#ShivajiNagar