सुतारवाडी परिसरात सर्वत्र वाढता डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मी ‘डेंग्यू नियंत्रण औषध फवारणी मोहीम’ राबवित आहे. या मोहिमेला जनतेकडून अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्रशासन याकरिता चोखपणे काम करत असतानाच, मी देखील या जीवघेण्या आजाराचा थैमान थोपवण्यात कार्य करत असल्याबद्दल परिसरातील नागरिक आवर्जून संपर्क साधून समाधान व्यक्त करत आहेत. जनसेवेचे कार्य करताना नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा नक्कीच बळ देणारा ठरतो. यापुढे देखील मी असाच आपल्या सेवेसाठी कटिबद्ध असेल, असा विश्वास मी याप्रसंगी देतो.