गोखलेनगरच्या सेवाभावी डॉक्टरांचा कार्यगौरव संपन्न
पुणे:-शिवाजीनगर माजी आमदार विनायक निम्हण
यांच्या वाढदिवसानिमित्त गेली २० वर्ष आरोग्य सप्ताहची परंपरा कायम ठेवुन दि ४ ऑगस्ट २०२२ रोजी गोखलेनगर येथील जनवाडी भागात मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते..
कार्यक्रमाचे उद्घघाटन परिसरातील डॉ.बि.डी.भुजबळ,डॉ.शशिकांत चव्हाण,डॉ.अपर्णा गोसावी,डॉ.मुस्ताक तांबोळी,डॉ.सुनिता सोमन,डॉ.संतोष जैन,डॉ.तेजस्विनी परदेशी,डॉ. जगन्नाथ जायभाय,डॉ.संजय वाडकर,डॉ.समीर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कामाचा कार्यगौरव म्हणून सर्व डॉक्टरांचा सन्मान शिबिराचे संयोजक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते करण्यात आला.
शिवाजीनगर भागातील बोपोडी,औंध पाषाण,मुळा रोड, न.ता.वाडी,फर्ग्युसन रोड येथील शिबिरा नंतर आज गोखलेनगर जनवाडी घेण्यात आलेल्या शिबिरात 575 वर नागरिकांनी भाग घेतला. 325 नागरिकांना चष्मेवाटप तर 50 नागरिकांच्या मोतीबिंदू शासकीय ग्लोबल हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहेत.
कालच्या कार्यक्रमाचे नियोजन उमेश वाघ यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत कपोते, सुभाष सूर्यवंशी,समद शेख, रुपेश सोनवणे,विशाल गायकवाड,संजय तुरेकर,दिलीप काळे, गणेश शिंदे यांनी केले होते. मंगला पाटील, असलम मिरजकर, मधुकर पवार,संजय डोंगरे,प्रवीण डोंगरे,धैर्यशील जगताप,बापू बनसोडे,कादर शेख, सत्तारभाई सत्तार, कलावती घाणेकर, नयना वाघ,भाग्यश्री सागवेकर, दिपाली शिगवण, चेतन शेंडे शेंडे ,प्रकाश धामणे, किरण ओरसे, प्रशांत मदने,विशाल कुसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.




