विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त “विनायकी क्रीडा महोत्सव २०२५”चे भव्य आयोजन

पुणे: सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्तविनायकी क्रीडा महोत्सव २०२५चे ते १० ऑगस्ट या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यस्तरीय बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

सनी निम्हण यांचा क्रीडा विकासासाठी पुढाकार

स्पर्धेविषयी माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि पुण्यातील तरुण राजकारणी सनी निम्हण यांनी सांगितले की, “माजी आमदार विनायक निम्हण यांनी हयात असताना आपल्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले. आता तीच परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत.”

ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेमुळे पुण्यातील क्रीडा विकासाला चालना मिळते आणि पुण्यात युवक सक्षमीकरणाला बळ मिळते. राज्यातील गुणवंत खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा, या हेतूने हा क्रीडा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जात आहे.

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

योनेक्स सनराइज सोमेश्वर करंडक २०२५ राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून ४२४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
ही स्पर्धा ते ऑगस्ट २०२५ दरम्यान लाईफ स्पोर्ट्स, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे पार पडणार आहे.

स्पर्धा खालील गटांमध्ये होणार आहे:

  • , ११, १३, १५ आणि १९ वर्षाखालील मुले मुली
  • पुरुष आणि महिला एकेरी तसेच दुहेरी गट

एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा

कै. आमदार विनायक निम्हण मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा ऑगस्ट रोजी गोविंद गार्डन मंगल कार्यालय, पाषाण येथे होणार आहे.
हि स्पर्धा , १०, १२ १५ वर्षाखालील गटांमध्ये खेळवली जाईल.

एकूण लाख रुपयांच्या पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय कॅरम अजिंक्यपद स्पर्धा

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि सनी निम्हण यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
गतवर्षीप्रमाणेच, यंदाही या स्पर्धेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

ही स्पर्धा ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान गोविंद गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे रंगणार आहे.

पुण्यातील क्रीडा संस्कृतीचा सन्मान

सनी निम्हण, हे पुण्यातील प्रसिद्ध राजकारणी, समाजसेवक आणि पुण्यातील तरुण नेते, यांच्या पुढाकाराने क्रीडा क्षेत्रात सतत नवनवीन संधी निर्माण होत आहेत.
विनायकी क्रीडा महोत्सव हा फक्त स्पर्धांचा कार्यक्रम नसून, तो पुण्यातील युवक सक्षमीकरण आणि क्रीडा विकासाचा उत्सव ठरत आहे.



Scroll to Top