विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती

शिक्षण हे केवळ ज्ञान संपादन करण्याचे माध्यम नव्हे तर आयुष्याला आकार देणारं खरं सामर्थ्य आहे असे आबांना कायम वाटायचं. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळाले तर त्यांच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो असे त्यांचे मत होते. त्यांचे हेच कार्य पुढे घेऊन जात त्याला व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विनायकी’ – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती देण्याचा आमचा मानस आहे. पदवी आणि पदविकेच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थेत शिकत असलेल्या पदवी व पदविकेच्या पात्र विद्यार्थ्यांची नावे या शिष्यवृत्तीसाठी सुचवावीत. त्यासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेचा निकष असून विद्यार्थी आर्थिक गरजू असावा अशी पात्रता ठरवली आहे. याबरोबरच ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि केवळ काहीच गुणांनी शिष्यवृत्तीस मुकलेल्या निवडक पात्र विद्यार्थाना प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ संपन्न होणार आहे.

शिक्षणाबरोबरच सर्वसामान्यांना उत्तम आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठीही आबा आग्रही असायचे. त्यातून त्यांनी नियमितपणे आरोग्य शिबीरांचे आयोजन केले होते. या महा-आरोग्य शिबीरात ५९६०० रुग्णांनी सहभाग घेतला आणि रोगमुक्त आयुष्याकडे वाटचाल केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुनियोजितपणे मोफत आरोग्यसुविधा देणारे हे पुण्यातील पहिलेच महा-आरोग्य शिबीर ठरले. या उपक्रमासारखाच ‘विनायकी’ या शिष्यवृत्तीचा उपक्रमही मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल आणि यातून गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात मोलाची मदत होईल असा मला विश्वास आहे!
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक

#SunnyNimhan #vinayakaabanimhan #students #education #school #student #college #university #studentlife #study #learning #teachers #teacher #india #science #career #class #kids

Scroll to Top