मोफत महा-आरोग्य शिबीर

मोफत महा-आरोग्य शिबीर

कार्यसम्राट मा. आमदार स्व. विनायक आबा निम्हण यांनी गोरगरीब जनतेला केंद्रस्थानी मानून केलेल्या कामाचा वारसा पुढे नेण्याचा माझा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो. आबांनी गोरगरीब गरजूंच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवले, त्यासोबतच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम केलं. त्यांच्या या कार्याला पुढे घेऊन जाणेच त्यांना खरे अभिवादन ठरेल! या विचारातून आमच्या टीमने ‘कार्यसम्राट मोफत महा-आरोग्य शिबीराचे’ आयोजन केले आहे. आज राज्याचे संवेदनशील व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण या अभियानाचा शुभारंभ करतोय!

‘एकच ग्वाही, तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्वकाही’ या उक्तीला सार्थ ठरवण्यासाठी मुंबई व पुणे येथील नामांकित व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर्स या शिबिरास येणार आहेत. माझी सर्व नागरिक बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की आपण या शिबिराचा जास्तीतजास्त लाभ घ्या व आपले नातेवाईक, मित्र परिवारापर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचवा! जेणेकरून अनेक गरजू व्यक्तींना आपल्या या शिबिराच्या माध्यमातून उत्कृष्ट उपचार मिळतील!

मोफत महा-आरोग्य शिबीर 2
मोफत महा-आरोग्य शिबीर 1
Scroll to Top