सध्याच्या काळात (विशेषतः कोविडकाळापासून) निरोगी जीवनाचे महत्त्व सर्वांना प्रकर्षाने जाणवत आहे. सर्वांना आपले आरोग्य जपण्यासाठी प्रोत्साहित करणे व आरोग्य सुविधांबद्दल जनजागृती करत आरोग्यसेवा पुरविणे हे निरोगी समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आवश्यक आहे. हाच उद्देश ध्यानात घेऊन, आम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त आपला प्रभाग क्र.१२ (औंध-सोमेश्वरवाडी-बालेवाडी) मधील नागरिकांसाठी ‘सनी’ज सुआरोग्य अभियान’ या भव्य मोफत ‘आरोग्य शिबिराचे’ आयोजन करत आहोत. यामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह अत्यंत महत्त्वाच्या विविध आरोग्य सेवासुविधा गरजू नागरिकांना पुरविल्या जाणार आहेत. या आरोग्य शिबिरात प्रभागातील आबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांची आरोग्यसेवा या निमित्ताने माझ्या हातून घडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.
आपला नम्र
*सनी विनायक निम्हण*
मा. नगरसेवक