गौरी-गणपती सजावट स्पर्धा

नुकताच दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला गेला. त्यामुळे नागरिक आता बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहे. लॉकडाऊननंतर गणेशोत्सव पहिल्यांदा दणक्यात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे.
आम्ही देखील दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा ‘ आयोजित करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी देखील या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद द्याल व तितक्याच उत्साहाने सहभागी व्हाल.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. आपण 8308123555 क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हा !!
आपला नम्र
सनी विनायक निम्हण
मा. नगरसेवक

Scroll to Top