औंध-बोपोडी परिसरात सनी निम्हण यांच्या पुढाकाराने वसुबारस पूजन सोहळा

औंध :

वसुबारस पूजन : गोधनाची आराधना, समृद्धीची वंदना!

दिवाळीच्या मंगल प्रारंभाचा पहिला दिवस ‘वसुबारस’ हा मातृत्व, गोधन आणि समृद्धीच्या पूजनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या पारंपरिक आणि श्रद्धेच्या दिवशी गोधन पूजनाचा सुंदर उपक्रम माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमामध्ये गोधनाचे पूजन करून आपल्या संस्कृतीतील मातृत्व, कृतज्ञता आणि समृद्धीच्या मूल्यांचा सन्मान करण्याचा हेतू आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन या शुभ क्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे.

 दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५
वेळ: सायं. ६.०० ते ८.००

पूजन स्थळे:
• परिहार चौक, औंध
• चंद्रकांत गायकवाड चौक, मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळ, औंध
• भाले चौक, नागरस रोड, औंध
• अमित मुरकुटे संपर्क कार्यालय, बोपोडी
• पुणे आयटी पार्क, भाऊ पाटील रोड, बोपोडी

या कार्यक्रमाद्वारे शहरात गोधनपूजनाची परंपरा जपून समाजात एकात्मता आणि श्रद्धेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: www.sunnynimhan.com

Scroll to Top