स्कूलबससाठी नवीन नियमवाली तयार करावी

पुण्यातील वाघोली येथे नुकत्याच झालेल्या स्कूलबसच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसोबतच पालकवर्ग देखील भीतीच्या छायेत वावरतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे.

यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने एक समिती गठीत करून स्कूलबससाठी नवीन नियमवाली तयार करावी, अशी मागणी मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री मा. दिपकजी केसरकर यांच्याकडे इमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे.

देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय घ्यावा आणि सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.

@mieknathshinde@devendra_fadnavis
@ajitpawarspeaks@kesarkar_deepak

#sunnynimhan#vinayakaabanimhan#eknathshinde#ajitpawar#devendrafadnavis#Pune#Wagholi#RoadSafety#Gps#roadaccident#SchoolBusSafety#schoolbus#accident#schoolbusaccident#Maharashtra

Scroll to Top