पुणे, दि. २९ मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील पिके वाहून गेली, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ आणि ‘सनीज फूड्स’ यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाख, ५५ हजार, ५५५ रुपयांचा धनादेश ‘सोमेश्वर फाऊंडेशन’चे विश्वस्त व नगरसेवक सनी निम्हण यांनी सुपूर्द केला.