पुणे : ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ आयोजित कार्यसम्राट आ. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल स्पर्धा. पुणे आयडॉल स्पर्धा ही विविध चार गटांत होते. या स्पर्धे ची महाअंतिम फेरी आज शनिवार, दि. २४ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडणार आहे, अशी माहिती सनी निम्हण यांनी दिली.
पुणे आयडॉल स्पर्धेचे यंदा २३वे वर्ष आहे. यंदा या स्पर्धेत ७०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक आणि उपांत्य फेरी पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध येथे पार पडली, तर अंतिम फेरी शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे. सकाळी १० वा. अंतिम फेरीचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होणार आहे, तर पारितोषिक वितरण दुपारी ३ वाजता केंद्रीय सहकार, विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धिरज घाटे यांच्या हस्ते पार पडणार आहे.
पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉईस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते दुपारी २ वाजता सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण ज्येष्ठ गायक राजेश दातार, जितेंद्र भुरुक, मंजुश्री ओक करणार आहेत. तसेच यादरम्यान ‘गीतो का सफर’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी आज
