रविवार हा सुट्टीचा दिवस साधून अनेक मंडळांनी असे आरोग्य शिबिर आयोजित केले होते..

कोरोनानंतर गणेश उत्सव सर्व मंडळं फार उत्साहाने साजरा करत आहेत.

सण साजरा करत असताना एक चांगली गोष्ट जाणवली ती म्हणजे जास्तीत जास्त मंडळं ही सामाजिक भान जपत मोफत आरोग्य शिबीर,मोफत नेत्र तपासणी शिबीर, रक्तदान शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत.

रविवार हा सुट्टीचा दिवस साधून अनेक मंडळांनी असे आरोग्य शिबिर आयोजित केले होते..

आमच्या विठ्ठल सेवा मंडळ (एक गाव एक गणपती) यांनी देखील भव्य मोफत आरोग्य शिबीर, मोफत नेत्र तपासणी, मोफत औषध वाटप व चष्मे वाटप आयोजित केले होते, याला सोमेश्वरवाडीतील नागरिकांनी उत्स्फूर्त

प्रतिसाद दिला.

सोमेश्वर मित्र मंडळ पाषाण यांचे रक्तदान, कोकाटे तालीम मंडळ यांचे मोफत नेत्र तपासणी, साई मित्र मंडळ बालेवाडी यांचे रक्तदान, लक्ष्मीमाता मित्र मंडळ बालेवाडी यांच्या रक्तदान व आरोग्य शिबिर यांना आवर्जुन भेटी दिल्या..