‘सनी’ज गृह गणेश वंदना’ उपक्रम

श्री गणराय हे सुखकर्ता-विघ्नहर्ता देव आहे. गणरायासमक्ष आपण सर्व अरिष्ट दूर होऊन सुखसमृद्धी यावी ही मनोकामना करतो. गणेशोत्सवाला गणपती बाप्पाचे आगमन होताच सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण होते. या गणेशोत्सव दरम्यान मी ‘सनी’ज गृह गणेश वंदना’ या उपक्रमाद्वारे आपल्या घरी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपल्यासोबत हितगुज साधत आहे. श्रीगणेशाचे आशीर्वाद घेत आपल्यासोबत सुखदुःखांवर संवाद साधण्याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न आहे. काल इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत औंध येथील घरगुती गणपती दर्शनाला अतिशय चांगल्या प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार.

चला तर मग, भेटूया लवकरच आपल्या घरी!

गणपती बाप्पा मोरया!!!