शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सनी निम्हण यांच्याकडून ५ लाखांची मदत

पुणे : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. हा धनादेश सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त तथा नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईत सुपूर्त केला आहे.

दरवर्षी सोमेश्वर फाउंडेशन आणि सनीज फूड्स जनसामान्यांसाठी दर्जेदार फराळ सवलतीच्या दरात उपलब्ध करतात. हजारो नागरिकांचा या फराळाला प्रतिसाद मिळतो. “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर चालणाऱ्या या उपक्रमातून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे भाग्य निम्हण कुटुंबाला मिळते. यंदा या फराळ विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा काही हिस्सा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचा संकल्प त्यांनी केला होता.

या आवाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि संकल्प यशस्वी झाला. फराळ विक्रीतून मिळालेल्या निधीतील हिस्सा मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या संकटकाळात मदत पोहोचवण्याचा एक आदर्श ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सनी विनायक निम्हण यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top