पुणे :लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची मोठी जबाबदारी असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर ठोस उपाययोजना राबवणे आणि लोकांशी थेट संवाद ठेवणे, हीच लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित भूमिका असते. मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित, आधुनिक दृष्टिकोन असलेला आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारा असतो, तेव्हा विकासाची दिशा अधिक परिणामकारक ठरते. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन पुण्यात सक्रिय समाजकारणातून राजकारणात उतरलेले सनी विनायक निम्हण हे याचे ठळक उदाहरण आहेत.कल्पक विचार, स्पष्ट धोरण आणि लोकांचा सक्रिय सहभाग या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवत सनी निम्हण काम करत आहेत. लोकांच्या सहभागातूनच आदर्श प्रभाग आणि सक्षम समाज घडू शकतो, ही त्यांची ठाम भूमिका असून त्याच विचारधारेतून त्यांची राजकीय वाटचाल सुरू आहे.पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना सनी निम्हण यांनी Policy, Planning आणि Public Participation (3P) या संकल्पनेवर आधारित कार्यपद्धती प्रभावीपणे राबवली. याचाच भाग म्हणून त्यांनी ‘Solve with Sunny’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत ‘विकासासाठी सूचना देऊया – सगळे मिळून आदर्श प्रभाग घडवूया’ हा लोकाभिमुख आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभागातील आठ ठिकाणी सूचना केंद्र उभारण्यात आली होती. शेकडो नागरिकांनी QR कोड स्कॅन करून Google Form भरत प्रभागाच्या विकासासाठी थेट सूचना मांडल्या. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या तसेच तक्रारी नोंदवल्या. या सर्व सूचना व तक्रारींचा सखोल अभ्यास करून त्या आगामी वचननाम्यात समाविष्ट करण्यात येणार असून, हाच वचननामा पुढे प्रत्यक्ष विकासनामा ठरेल, असा विश्वास सनी निम्हण यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी सनी निम्हण स्वतः सोसायट्या आणि वस्ती विभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.माजी आमदार विनायक निम्हण यांचा समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा सनी निम्हण यांना लाभला आहे. त्या वारशाला आधुनिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि नव्या विचारांची जोड देत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकारणासोबतच समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग कायम आहे.माजी नगरसेवक असलेले सनी निम्हण हे पुन्हा एकदा औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकास या तीन आधारस्तंभांवर प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.
