केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन केले. औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ बोपोडी येथील ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह भाजम आणि आरपीआयचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मोहोळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा विचाराने आणि लोकांसाठी २४ तास काम करणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात बिकट अवस्था असून त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारही मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवार आयात करावे लागत आहेत. आम्हाला केवळ सत्ता नको, तर जनतेची सेवा करायची आहे. मागील पाच वर्षात पुणे महापालिकेत केलेल्या कामांमुळे शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुढे म्हणाले की, मागील सहा वर्षांतील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे काम, देशातील मोदी सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे काम पाहिल्यास घरोघरी सरकारी योजनांचे लाभार्थी दिसतात. पावेळी उमेदवार सनी निम्हण यांनी सांगितले की, स्वर्गीय मंत्री चंद्रकांत छाजेड यांचा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आणि स्वर्गीय आमदार विनायक निम्हण पांची काम करण्याची धमक घेऊन आम्ही चारही उमेदवार या प्रभागाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केले जाईल. बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, महापालिकेचे दोन दवाखाने दर्जेदार करून ट्रॉमा केअर सेंटर सुरू करू, तसेच दर्जेदार शिक्षणासाठी ई-लर्निंग स्कूल सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निम्हण यांनी सर्वं जाती-धर्माना सोबत घेऊन विकास करण्यासाठी जनतेसमोर जात असल्याचेही नमूद केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, राज्यात आणि देशात आज डबल इंजिन सरकार आहे. पुणे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी पुणे शहरातही भाजपला बहुमत द्यावे, माणजे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार पुणे शहराला विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर घेऊन जाईल
पुण्याला सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही:राष्ट्रवादीला उमेदवार ‘आयात’ करावे लागतायत, मुरलीधर मोहोळांचा खोचक टोला
