डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजच्या युगातही नवी दिशा, नवी प्रेरणा देऊन जातात.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे आजच्या युगातही नवी दिशा, नवी प्रेरणा देऊन जातात.
 
त्यांच्या विचारांची, कार्याची आणि व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची माहिती आजच्या पिढीला मिळावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष ऑनलाइन संवाद आयोजित करत आहोत.
 
दलित इंडियन चेंबर ऑफ़ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे(DICCI)अध्यक्ष मा. मिलिंदजी कांबळे हे आपणासोबत संवाद साधणार आहेत. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील आजवर कधीही न ऐकलेल्या काही पैलूंचा त्यांनी केलेला उलगडा हा आपणास निश्चितच आवडेल. आपण हा ऑनलाइन संवाद जरूर बघा आणि इतरांना पण सांगा.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन!